- जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचा आदेश
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे, नदी, नाले तुडुंब भरले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे शाळा - महाविद्यालयांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी, खानापूर तालुक्याच्या शिक्षणाधिकारी राजश्री कुडची यांच्याकडे शाळा - महाविद्यालयांना सुट्टी देण्याची मागणी केली होती. त्याला अनुसरून शिक्षणाधिकारी राजश्री कुडची, यांनी बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी व बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे सुट्टी देण्याबाबत शिफारस केली होती. खानापूर तालुक्यातील पावसाची परिस्थिती लक्षात घेता, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी, खानापूर तालुक्यातील शाळा - महाविद्यालयांना शुक्रवार दि. १९ व शनिवार दि.२० जुलै, असे दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे.
0 Comments