सांबरा / वार्ताहर
श्रीदत्त संस्थान बाळेकुंद्री वतीने आज रविवारी या वर्षीच्या गुरुपौर्णिमा सोहळा महाभिषेक संकल्पासह करण्यात आला.गुरुपोर्णिमे निमित्ताने हजारो भक्तांनी श्री पंतमहाराज दर्शनासह महाभिषेक संकल्पात सहभाग घेतला.
गुरुपौर्णिमा अर्थात गुरूंना शरण जाण्याचा परमपावन दिवस. या मंगलमय दिवसाचे औचित्य साधून श्री दत्त संस्थानच्या कार्यकारिणीने श्री क्षेत्री मोठ्या प्रमाणात अभिषेक करण्याचा संकल्प केला होता. गुरु पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आज पहाटेपासूनच अभिषेक, पूजा, महाआरती, भजन आदी कार्यक्रम संपन्न झाले. दर्शनाला उपस्थित हजारो भाविकांनी दुपारी महाप्रसादाचा लाभ घेतला.
0 Comments