•  मुडलगी तालुक्यातील घटना  

बेळगाव / प्रतिनिधी 

पत्नीच्या चारित्र्यावरील संशयातून  पतीने पत्नीसह एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. बेळगाव जिल्ह्याच्या मुडलगी तालुक्यातील लक्ष्मीश्वर गावात ही घटना घडली.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, मौलासाब यासीन मोमीन (वय २८) हा आपल्या दुचाकीवरून शिल्पा नामक महिलेला घेऊन जात असताना शिल्पाचा पती अमोघ ढवळेश्वर याने त्यांना पाहिले, यावेळी संताप अनावर झाल्यामुळे अमोघ याने पत्नी शिल्पा आणि  मौलासाब मोमीन यांच्यावर चाकूने हल्ला करताच मौलासाब याचा जागीच मृत्यू झाला तर शिल्पा ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुरगोड पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून कुलगोड पोलिस स्थानकात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.