खानापूर / प्रतिनिधी 

खानापूर - नंदगड  मार्गावर झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. खानापूर तालुक्याच्या कौंदळ गावानजीक खानापूर - नंदगड मार्गावर झाड कोसळल्याने अडथळा निर्माण झाला.

या मार्गावर अनेक जुनाट वृक्ष आहेत. पाऊस व वाऱ्यामुळे एखादा वृक्ष कोसळल्यास  वाहतुकीची समस्या निर्माण होत असल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जुनाट वृक्ष हटवावेत अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.