- अपघातात रिक्षाचालकासह प्रवासी गंभीर
- बेळगाव शिवाजीनगर पेट्रोल पंपानजीक घटना
बेळगाव / प्रतिनिधी
एका खासगी बसच्या चालकाचा ताबा सुटल्याने बसची दुभाजकासह बाजूने जाणाऱ्या ऑटो रिक्षाला धडक बसली. बेळगाव छत्रपती शिवाजीनगर येथील पेट्रोल पंपाजवळ रविवारी रात्री उशिरा बेळगाव उत्तर वाहतूक पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली.
या अपघातात ऑटो रिक्षा चालकासह ऑटोमध्ये प्रवास करणारा एक वृद्ध जखमी झाला. तसेच बसच्या धडकेने पथदीपही उखडून पडला. या घटनेनंतर नागरिकांनी बस चालकाला ताब्यात घेऊन पोलिसांना अपघाताची माहिती दिली. बेळगावच्या रामदेव हॉटेल, आरटीओ सर्कल ते गांधीनगरपर्यंत खासगी बसेस धावतात.त्यामुळे पादचाऱ्यांना प्रवास करणे कठीण झाले आहे.
0 Comments