खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील कौलापूरवाडा गावात दोन दिवसांपूर्वीचं पोल्ट्री फार्म विरोधात खानापूर ब्लॉक काँग्रेसने तीव्र आंदोलन करून निषेध केला. गावकऱ्यांनीही त्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
या संदर्भात रविवार (दि. २१ जुलै) रोजी खानापूर तालुक्याच्या पाहणी दौऱ्यावर आलेल्या जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना तालुका ब्लॉक काँग्रेसतर्फे निवेदन सादर करण्यात आले. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे पोल्ट्री फार्म बंद करावे किंवा अन्यत्र हलवावे. या पोल्ट्री फार्ममुळे गावातील जेष्ठ व्यक्ती व मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे या विषयावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे खानापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष तथा काँग्रेस नेते ईश्वर घाडी यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना पटवून दिले. या संदर्भात चौकशी करावी. येत्या काळात कायदेशीर मार्गाने या समस्येला सामोरे जात योग्य तो तोडगा काढून ग्रामस्थांना आरोग्यदायी वातावरण देऊया, आम्ही तुमच्यासोबत राहू असे ते म्हणाले.
यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महादेव कोळी, काँग्रेस नेते सुरेश जाधव, दीपक कवठणकर, यांच्यासह कौलापूरवाडा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments