- इतिहासात पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची निवड
मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची निवड झाली आहे. या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक यांनीही राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे.
- मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून स्वीकारला पदभार :
सुजाता सौनिक यांनी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळला आहे. आता त्यांना मुख्य सचिवपदी नियुक्त करण्यात आले आहे. सुजाता सौनिक यांना एक वर्षाचा कार्यकाळ लाभणार आहे. कारण जून २०२५ मध्ये त्या निवृत्त होणार आहेत. आज (रविवार) संध्याकाळी मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून त्यांनी सूत्रे हाती घेतली.
- पती आणि पत्नीने एक पद भूषवण्याची पहिलीच वेळ :
सुजाता सौनिक या राज्यातल्या वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. त्या निवृत्त सनदी अधिकारी मनोज सौनिक यांच्या पत्नी आहेत. याआधी मनोज सौनिक यांनीही राज्याचे मुख्य सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. सुजाता यांचीही याच पदी नियुक्ती झाली. पती आणि पत्नीने एकाच पदावर नियुक्त होणं हे पहिल्यांदाच घडलं आहे. नितीन किरीर यांना तीन महिन्यांचा अतिरिक्त कार्यकाळ देण्यात आला होता. तो कालावधी संपल्यानंतर आता सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन करीरी यांना कालावधी वाढवून देण्यात येईल अशी चर्चा होती. मात्र आता त्यांच्या जागी सुजाता सौनिक यांना हा पदभार देण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोस्ट करत सुजाता सौनिक यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments