बेळगाव / प्रतिनिधी
डॉक्टर्स डे निमित्त नेत्र, त्वचा आणि देहदान करणारे ज्येष्ठ नागरिक आनंद मुरनाळ हे मृत्यूनंतर अजरामर झाले आहेत. आनंद श्रीनिवासराव मुरनाळ (वय ७८, रा. ८ वा क्रॉस, भाग्यनगर, बेळगाव) यांचे रविवार दि. ३० जून रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.
दिवंगत व्यक्तीच्या शेवटच्या इच्छेनुसार बैलहोंगल येथील डॉ. रामण्णा चॅरिटेबल ट्रस्टला देहदान करण्यात आला. डॉ. रामण्णा चॅरिटेबल ट्रस्टमार्फत वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांचे दोन्ही डोळे केएलई डॉ. प्रभाकर कोरे नेत्र भांडाराला दान केले. तसेच भाजलेले रुग्ण लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांची त्वचा केएलई डॉ. प्रभाकर यांच्या केएलई रोटरी स्किन रिपॉझिटरीला दान करण्यात आली. याशिवाय केएलई श्री. बी. एम. कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना मृत्यनंतर अभ्यासासाठी देहदान करण्यात आला. आनंद मुरनाळ यांनी दोन वर्षांपूर्वी देहदानाचे आश्वासन दिले होते.
केएलईचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य, केएलई रुग्णालयाचे रक्तपेढीचे प्रमुख श्रीकांत विरागी, सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे आणि केएलई श्री. बी. एम. के.आयुर्वेद महाविद्यालय, बेळगाव च्या शरीरशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. महांतेश रामण्णावर यांनी मुरनाळ यांच्या कुटुंबियांचे आभार मानले.
0 Comments