चिक्कोडी / वार्ताहर 

दुचाकी आणि टाटा एस यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. चिक्कोडी तालुक्यातील निपाणी - मुधोळ राज्य महामार्गावर चिक्कोडी वाहतूक पोलिस स्थानकाच्या हद्दीत चिंचणी टोलनाक्यानजीक ही घटना घडली. महादेवी शिरगुप्पी (वय ५४) असे मृत महिलेचे नाव असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.तर जखमी महांतेश शिरगुप्पी यांना चिक्कोडी तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चिक्कोडी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.