खानापूर / प्रतिनिधी 

रामनगर पोलिस स्थानकासमोर अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला रामनगर उपनिरीक्षक देत असलेला त्रास कारणीभूत असल्याचा आरोप करीत शनिवारी दुपारी कुलंबी समाजाने मृत भास्कर याला न्याय मिळावा यासाठी रामनगर शिवाजी चौकात शेकडो महिला व पुरुषांनी निदर्शने केली. रामनगर हनुमान गल्लीतील भास्कर बोन्डीलकर (वय २५) असे मृत युवकाचे नाव आहे.

रामनगर पोलिसांकडून देण्यात येत असलेल्या त्रासामुळे भास्कर याने आत्महत्या केल्याचे उपस्थित असलेल्या नागरिकातून बोलले जात होते. या घटनेने रामनगर परिसरात खळबळ माजली आहे.

शनिवारी दुपारी कुलंबी समाजाने मयत भास्कर याला न्याय मिळावा यासाठी रामनगर शिवाजी चौकात शेकडो महिला व पुरुषांनी निदर्शने केली. दुकाने बंद ठेवण्यात आली होती. भास्कर ज्या ठिकाणी हा प्रकार केला त्या ठिकाणी जाण्याची विनवणी पोलिसांना केली. मात्र एकालाही जाऊ दिले नाही . पोलीस स्थानक समोर कारवार. दांडेली येथून मागवलेल्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयकुमार यांनी जमलेल्या लोकांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित नागरिकांनी त्यांचे ऐकले नाही. अखेर कारवारचे पोलीस अधीक्षक रघुनाथन यांनी उपस्थित जनतेचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना समजावले मी तुमच्या साठीच कारवारहून येथे आलो आहे. दोषींना कारवाई करून न्याय मिळवून देईन असे त्यांनी सांगितले.