- शोध मोहिमे दरम्यान आढळले तीन अर्भक
बेळगाव / प्रतिनिधी
अर्भक विक्री प्रकरणाला धक्कादायक वळण लागले असून आरोपी असलेला डॉक्टर अब्दुलगफार लाड खान यांच्याकडून भ्रूण हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या सूचनेवरून पोलीस, आरोग्य विभाग आणि एफएसएल पथकाने आज (१६ जून) कित्तूर तालुक्यातील तिगडोळी गावाजवळील बनावट डॉक्टराच्या फार्महाऊसची तपासणी केली असता शेतात तीन गर्भ मृतावस्थेत आढळून आले. हे भ्रूण आणून पुरणारा डॉक्टर अब्दुलगफार लाड खानचा सहाय्यक रोहित कुप्पासगौडर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रोहित अनेक वर्षांपासून अब्दुलगफार लाड खानचा सहाय्यक म्हणून काम करत होता. हे प्रकरण कित्तूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले. डीएचओ डॉ. महेश कोणी, एसी प्रभावती फकीरपूर, बैलहोंगलचे डीवायएसपी रवी नाईक आणि सीपीआय यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
0 Comments