बेळगाव / प्रतिनिधी 

नोंदणी क्रमांक नसलेली वाहने गुन्हेगारी कृत्यांमध्ये वापरली जात असून, यामध्ये निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याचे मागील प्रकरणांच्या तपासात समोर आले आहे. कर्नाटक सरकारच्या अधिसूचनेनुसार दि. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत आणि एचएसआरपी (H.S.R.P) नंबर प्लेट नसलेल्या सर्वप्रकारच्या वाहनांसाठी (H.S.R.P) नंबर प्लेट अनिवार्य असेल. येत्या काळात बेळगाव शहर परिसरात धावणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे

वाहन मालकांकडे त्यांच्या वाहनांसाठी अनिवार्य नोंदणी क्रमांक असल्याची खात्री करण्यात येणार असून नोंदणी क्रमांकाशिवाय चालणारी वाहने जप्त करून कायदेशीर कारवाई केली जाईल. याबाबत वाहनधारकांनी जागरूक राहून वाहनांसाठी अनिवार्य वाहन नोंदणी क्रमांकाचा अवलंब करून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.