• खानापूर तालुक्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची प्रगती आढावा बैठक

खानापूर / प्रतिनिधी 

खानापूर तालुक्यातील प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश कॅनरा लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार विश्वेश्वर हेगडे - कागेरी यांनी दिले. 

शुक्रवार दि. १४ जून रोजी खानापुरला भेट देऊन  त्यांनी तालुक्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची प्रगती आढावा बैठक घेतली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.