विजयपूर / वार्ताहर
केएसआरटीसी परिवहनची बस आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. तिकोटा (जि. विजयपूर) शहरात तिकोटा पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. शाहिन वालीकर आणि सलीम वालीकर असे अपघातातील मृत दाम्पत्याचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, रत्नागिरीहून विजयपूरकडे येणारी केएसआरटीसी परिवहनची बस होती, तिकोटा शहरात अली असता, परिवहनची बस आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली, ही धडक इतकी जोराची होती की, शाहिना आणि सलीम वालीकर या दाम्पत्याच्या यात जागीच मृत्यू झाला.
0 Comments