- ५६० अग्निवीर जवानांनी घेतली देशसेवेची शपथ
बेळगाव / प्रतिनिधी
मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमधून अग्निवीर जवानांची तिसरी तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली असून आज अग्निवीर जवानांचा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला.
३१ आठवड्यांच्या प्रशिक्षणानंतर बेळगावमधील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमधून ५६० अग्निवीर प्रशिक्षणार्थींना देशसेवेची शपथ देण्यात आली. ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी पथसंचलनाचे निरीक्षण केले. अग्निवीर मुकेश चामूर आणि मेजर अभिषेक कश्यप यांच्या नेतृत्वाखाली शिस्तबद्द पद्धतीने दीक्षांत संचलन पार पडले.
तिरंगा, मराठा लाईट इन्फन्ट्रीचा ध्वज आणि पवित्र ग्रंथाच्या साक्षीने अग्निवीर जवानांनी देशसेवेची शपथ घेतली. ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी अग्निवीर जवानांना उद्देशून मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान उत्तम कामगिरी केलेल्या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी अग्निवीर जवानांच्या पालकांनी पथसंचलन सोहळा पाहण्यासाठी हजेरी लावली होती.
या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇
0 Comments