बेळगाव / प्रतिनिधी 

सेंट मेरीज शाळेची विद्यार्थिनी तनिष्का शंकर नावगेकर हिने दहावी परीक्षेत 625 पैकी 620 गुण घेऊन उत्तम यश संपादित केल्याबद्दल तिचा शांताई वृद्धाश्रमाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

सिद्धार्थ उंदरे, माजी महापौर विजय मोरे यांच्या हस्ते तनिष्काचा सत्कार करण्यात आला. तनिश्काने केवळ अभ्यासातच नाही तर क्रीडा क्षेत्रातदेखील यश मिळविले असून तिच्या या यशाबद्दल माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले आहे. 

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून तनिष्काच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी यल्लाप्पा नावगेकर, शांता नवगेकर, शंकर नावगेकर, संगीता नावगेकर, चंद्रकांत सौरमा, चंद्रकांत नावगेकर,ज्योतिबा कदम, रूपाली कदम, डॉ. निर्मला खोत आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.