रायबाग / वार्ताहर
मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. रायबाग तालुक्यातील परमानंदवाडी गावात ही घटना घडली आहे.महेश राजू पट्टणकुडी असे या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
दरम्यान महेशच्या मित्रानेच त्याचा खून केल्याचा आरोप महेशचा भाऊ उमेश याने केला आहे. महेशच्या मानेवर चाकूने वार केल्याच्या खुणा आढळून आल्याचे उमेश याने सांगितले आहे. शनिवारी रात्री महेश आणि त्याचा मित्र रमेश यांनी एकत्र पार्टी केली होती.यावेळी दोघांनीही मद्यपान केले होते. त्यामुळे दारूच्या नशेत रमेशने माझा भाऊ महेशचा खून केला असावा असा उमेशला संशय आहे.
घटनेची माहिती मिळताच रायबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. महेशच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. हा खून नेमका कोणी व कशासाठी केला हे पोलिस तपासानंतर स्पष्ट होईल.
0 Comments