• कर्नाटक राज्य रयत संघटना - हसिरू सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळावी, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हसिरू सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. शनिवार दि. (१८ मे) रोजी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना सदर मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना, कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे गणेश इलिगेर म्हणाले, जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. अशावेळी शेतकरी स्वतःच्या शेतातील पिकाला पुरेसे पाणी देऊ शकत नाही. तेव्हा डाव्या व उजव्या काठावर पाणी आणि २४ तास अखंड वीज द्यावी. अजूनही नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी अशी मागणी त्यांनी केली. 

याप्रसंगी आणखी एका शेतकरी नेत्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकरी आत्महत्या थांबल्या पाहिजेत आणि सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीला दुष्काळी मदतीची रक्कम देण्यात यावी. त्यानुसार नुकसानग्रस्त भागातील पिकांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर दुष्काळी मदत द्यावी असे आवाहन केले. 

यावेळी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना व हसिरू सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.