उचगांव : स्वामी विवेकानंद हायस्कूल व व्हीबीएसएस गर्ल्स् हायस्कूलच्या दहावी १९९३-९४ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचास्नेहमेळावा नुकताच पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे गुरुजन वर्ग मेळाव्यास हजर होते. उचगाव, कल्लेहोळ, तुरमुरी, बसुर्ते, बेकिनकेरे, अतिवाड, कोनेवाडी येथील माजी विद्यार्थी उपस्थित होते.

३० वर्षानंतर ४५ ते ४७ वयोगटातील सर्व मित्र - मैत्रिणी विद्यार्थी दशेत जाऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. सर्व औपचारिक गोष्टींना फाटा देऊन जास्तीत जास्त एकमेकांशी हितगुज करणे हा उद्देश असल्यामुळे पहिल्या सत्रात ओळखी, मनसोक्त गप्पाटप्पा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी व गुरुजनांचे मौलिक विचार व अनुभव ऐकायला मिळाले.

दुसऱ्या सत्रात मनोरंजनाचा कार्यक्रम पार पडला. ललिता पाटीलने निवेदन केले. लावणी सम्राट बालाजी चिखले यांनी लावणी सादर करून आनंदीत केले.

स्नेहमेळाव्याची आठवण म्हणून सर्वांना मोमेंटो देण्यात आले. स्नेह मेळावा यशस्वी होण्यासाठी उमेश नागोजीचे, बाळू जाधव उत्तम सुर्वे, बालाजी चिकले, शंकर राक्षे, उमेश चौगुले सह इतरांनी विशेष परिश्रम घेतले. लीना फर्नांडिस यांनी आभार मानले.