बेळगाव / प्रतिनिधी
येत्या दि. ७ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शहरात घरोघरी जाऊन मतदार ओळखपत्रांचे वाटप केले.
आज शुक्रवार (दि.३) मे रोजी बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघांतर्गत गोंधळी गल्लीत घरोघरी भेट देऊन मतदार स्लिप वितरित केल्या. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले , मतदारांना मतदार ओळखपत्रावर त्यांच्या नावासह मतदान केंद्र ओळखता येणार आहे. मतदान केंद्राची अचूक माहिती मिळणार असल्याने मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र शोधण्यात कोणताही गोंधळ होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
तसेच मतदारांची सोय व्हावी आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी संबंधित विधानसभा मतदारसंघात बीएलओची स्थापना करण्यात आली आहे. ते घरोघरी जाऊन मतदार ओळखपत्रांचे वाटप करणार आहेत. जनतेने आपले मतदार ओळखपत्र घेऊन निश्चित केलेल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रोबेशनरी आयएएस अधिकारी शुभम शुक्ला, बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त पी.एन.लोकेश आदी उपस्थित होते.
0 Comments