• आजी गंगम्मा अंबिगेर यांची पत्रकार परिषदेत माहिती 

हुबळी / वार्ताहर 

माझी नात आणि अंजलीची बहीण यशोधा हिने काल फिनेल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असे अंजलीची आजी गंगम्मा अंबिगेर यांनी सांगितले. 

हुबळी येथे आज पत्रकारांशी बोलताना गंगम्मा अंबिगेर पुढे म्हणाल्या, अंजलीच्या मृत्यूला न्याय मिळावा यासाठी सर्वजण आमच्या पाठीशी उभे आहेत. मात्र आरोपीला दिलेली वागणूक निंदनीय आहे. उपचाराऐवजी त्याला जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली. माझी नात यशोदा आता बरी असून तिच्यावर किम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिनेच फोन करून आपण ठीक असून काळजी करू नका असे सांगितले आहे, असे गंगम्मा म्हणाल्या.