बेळगाव : कुद्रेमानी येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे एकनिष्ठ नेते सीमा सत्याग्रही ईश्वर कल्लाप्पा गुरव (वय ८१) यांचे सोमवारी पहाटे अल्पशा आजाराने केएलई रुग्णालयात निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन कर्ते चिरंजीव, तीन विवाहित कन्या, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आज सोमवार दिनांक २० रोजी दुपारी १२ वाजता कुद्रेमनी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तर रक्षाविसर्जन गुरुवारी करण्यात येणार आहे.
बेळगाव पश्चिम भागातील म. ए .समितीचे एकनिष्ठ नेते म्हणून त्यांची ख्याती होती. कुद्रेमानी हायस्कूल शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष,भाग्यलक्ष्मी क्रेडिट सोसायटीचे चेअरमन, कुद्रेमानी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, श्री बलभीम संघ परिवाराचे सल्लागार आदि पदे त्यांनी भूषविली. मराठा बँकेचे शाखा व्यवस्थापक संजय गुरव व बी.के.मॉडेल हायस्कूलचे शिक्षक राम गुरव यांचे ते वडील होत.
0 Comments