• भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांची टीका 
  • नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी व्यक्त केली इच्छा 
  • विश्वेश्वरय्यानगर येथील कन्नड सरकारी शाळेत बजावला मतदानाचा हक्क

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव जिल्ह्याच्या विकासात काँग्रेसचे योगदान शून्य आहे. त्याच भाजपकडे कर्तृत्वाची मोठी यादी आहे. यामुळे हताश झालेल्या काँग्रेसच्या मतदारांना त्यांनी पैसे वाटप सुरू केल्याची टीका बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी केली.

मंगळवारी बेळगाव शहरातील विश्वेश्वरय्यानगर येथील कन्नड सरकारी शाळेत रांगेत उभे राहून शेट्टर यांनी मतदान केले. यावेळी जगदीश शेट्टर यांच्यासमवेत खासदार मंगला अंगडी, श्रद्धा शेट्टर, संकल्प शेट्टर यांनीही मतदानाचा हक्क बजावला. 

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जगदीश शेट्टर पुढे म्हणाले, सर्वांनी सक्तीने मतदान केले पाहिजे. मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत असून, मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, असे मत व्यक्त केले पराभवाच्या भीतीने काँग्रेसचे नेते हतबल झाले असून, काँग्रेसला जनताच धडा शिकवेल, असे ते म्हणाले.