बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक उद्या रविवार दि. २६ मे २०२४ रोजी दुपारी ३ वाजता मराठा मंदिर, गोवावेस येथे बोलवण्यात आली आहे.
सदर बैठकीमध्ये १९८६ साली कन्नड सक्तीच्या आंदोलनाप्रसंगी कर्नाटक सरकारने करवलेल्या बेकायदेशीर गोळीबारात सीमाभागातील ९ समिती कार्यकर्ते हुतात्मा झाले होते. त्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी १ जून २०२४ रोजी हिंडलगा येथे होणाऱ्या कार्यक्रमाविषयी चर्चा करण्यात येणार आहे. तेव्हा या बैठकीला आजी-माजी लोकप्रतिनिधी, समिती कार्यकर्ते आणि महिलांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन बेळगाव तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व सचिव एम. जी. पाटील यांनी केले आहे.
0 Comments