• प्रथमच एक अमेरिकन संशोधक स्वीकारणार डॉक्टरेट  

बेळगाव / प्रतिनिधी 

केएलई (काहेर) च्या दि. २७ मे रोजी होणाऱ्या १४ व्या दीक्षांत समारंभात १७३९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याचे केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले. आज शनिवार दि. २५ मे रोजी बेळगाव शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. केएलईचा १४ वा दीक्षांत समारंभ २७ मे रोजी होणार आहे. 

या सोहळ्याला देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड आणि राज्यपाल थावरचंद गेहलोत उपस्थित राहणार असून यावेळी पहिल्यांदाच एका अमेरिकन संशोधकाला खैरे यांच्याहस्ते डॉक्टरेट प्रदान करण्यात येणार असल्यानेअभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेचे रिचर्ड डरमन हे गेल्या २७ वर्षांपासून केएलई सोबत काम करताना अनेक विषयांवर संशोधन करत आहेत. आपला देशात नवजात मुलांमध्ये अशक्तपणा (ॲनिमिया) जास्त प्रमाणात आढळतो. यावर त्यांनी संशोधन केले आहे, असे ते म्हणाले. 

या समारंभात १७३९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येत आहे. त्यामध्ये ४५ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, ३० पीएच.डी., १३ सुपर स्पेशालिटी, ६४४ पदव्युत्तर, १०२३ पदवीधर, ४ डिप्लोमा फेलोशिप, ११ प्रमाणपत्र अभ्यासक्रम यांच्यासह अन्य  ५ जणांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.