- दारूच्या नशेत सळईने वार करून केली होती हत्या
बेळगाव / प्रतिनिधी
दारूच्या नशेत सळईने वार करत पत्नीची हत्या करून फरार झालेल्या पतीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत माहिती देताना बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले, बैलहोंगल तालुक्याच्या हणबरहट्टी गावातील फकीराव्वा नाईक (वय ३५) या महिलेची हत्या करण्यात आली होती.
पती यल्लाप्पा नाईक याने दारूच्या नशेत लोखंडी सळईने वार करून पत्नीची हत्या केली होती. खुनानंतर त्याने पळ काढला होता. याप्रकरणी नेसरगी पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानुसार तपास करून फरार झालेल्या पतीला आम्ही बेड्या ठोकल्या आहेत.
मृत फकीराव्वा नाईकचा पती यल्लाप्पा अतिमद्यप्राशन करत होता. यापूर्वी अनेकवेळा त्याने पत्नीला मारहाण केली होती. याबाबत त्याला पोलिस स्थानकात बोलावून अनेकवेळा समज देण्यात आली होती. परंतु त्याने ही सवय सोडली नाही, असे ते म्हणाले.
0 Comments