- एकाचा मृत्यू तर दोघे जखमी : घटनेनंतर आरोपी फरार
- लोंढा ते खानापूर रेल्वे स्थानका दरम्यान घडली घटना
खानापूर / प्रतिनिधी
टीसी ने तिकीट विचारल्याने, एका मुखवटाधारी व्यक्तीने टीसीसह चार जणांवर चाकूने हल्ला केला. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. सदर घटना पुडुचेरी-दादर (चालुक्य एक्सप्रेस) मध्ये लोंढा ते खानापूर रेल्वे स्थानका दरम्यान घडली आहे. देवर्षी वर्मा (वय २४) असे खुनी हल्ल्यात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
या घटनेनंतर हल्ला करणारा आरोपी फरार झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तिकीट तपासण्यासाठी आलेल्या टीसीवर, मास्क घातलेल्या एका युवकाने, चाकूने जीवघेणा हल्ला केला असता, त्याला वाचवायला गेलेल्या इतर चौघांवरही त्या मास्क घातलेल्या युवकांने जीवघेणा हल्ला केला. त्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चारजण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
0 Comments