- जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची अधिकाऱ्यांना सूचना
- बेळगाव - चिक्कोडी विभागाची ग्रामीण पेयजल व स्वच्छता विभागाची बैठक
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी अधिका-यांना अनेक गावातील पिण्याच्या पाणी पुरवठा कामांची आर्थिक व प्रत्यक्ष पाहणी करून गावातील पिण्याच्या पाणीपुरवठ्याला कोणत्याही प्रकारे अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.
गुरुवारी शहरातील जिल्हा पंचायत सभागृहात बेळगाव आणि चिक्कोडी विभागाच्या ग्रामीण पेयजल व स्वच्छता विभागाच्या प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासली पाहिजे. दोन विभागातील गावपातळीवरील ओव्हरहेड टाक्यांची गावांनी महिन्यातून एकदा स्वच्छता करावी. त्यावर प्रभारी सहाय्यक कार्यकारी अभियंता यांनी लक्ष घालावे, अशा सूचना त्यांनी केल्या.
जलजीवन मिशनची (जेजेएम) कामे तातडीने पूर्ण करून ती पंचायतींना सुपूर्द करून प्रत्येक अधिकाऱ्याने पंचायतींना प्रत्यक्ष भेट देऊन पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी, अशी सूचना केली. याचे पर्यवेक्षण सहाय्यक कार्यकारी अभियंता यांनी करावे, असे जीपीएएमचे सीईओ राहुल शिंदे यांनी सांगितले.
या बैठकीला ग्रा.पं.चे प्रकल्प संचालक डॉ.एम. कृष्णराजू, आरडीडब्ल्यूएस बेळगाव विभाग कार्यकारी अभियंता शशिकांत नायक, चिक्कोडी विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग राव, तालुका सहाय्यक कार्यकारी अभियंता, सल्लागार आणि कंत्राटदार उपस्थित होते.
0 Comments