हुक्केरी / वार्ताहर
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या कोयना धरणातील पाणी कृष्णा नदीत सोडण्याची विनंती महाराष्ट्र सरकारला करण्यात आली असल्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हापालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
गुरुवारी हुक्केरी येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रातून पाणी सोडले जाईल असा आम्हाला विश्वास आहे. कृष्णा नदीत आणखी दहा दिवस पुरेल इतके पाणी आहे. पुढे हिडकल धरणातून पाणी सोडू दरम्यान, महाराष्ट्रातून पाणी सोडले तर ती गैरसोय होणार नाही असे त्यांनी सांगितले.
हुबळी येथील अंजलीच्या हत्येनंतर भाजपचे नेते आंदोलनात सहभागी झाले नाहीत, यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना, भाजप प्रत्येक गोष्टीचा राजकीय वापर करते.भाजप फक्त निवडणुकांपुरतेचं लढेल. भाजपची धडपड इतरांना न्याय देण्यासाठी नाही, लोकांनी भाजपची मानसिकता जाणून घ्यावी असे ते म्हणाले.
अंजलीच्या हत्येशी सरकारचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई यापूर्वीच देण्यात आली आहे. केंद्राकडून रक्कम येणे बाकी आहे, त्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. प्रज्वल रेवण्णा पेन ड्राईव्ह प्रकरणाच्या चौकशीबाबत गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे ते म्हणाले.
0 Comments