• कूपनलिकांनाही पाणी नाही

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगावच्या विविध भागात सुरू झालेले १२ आरओ प्लांट तांत्रिक अडचणी आणि देखभालीअभावी बंद पडले आहेत. शुद्ध पिण्याच्या पाण्याचे युनिट गेल्या तीन वर्षांपासून गंजत आहेत. तर दुसरीकडे बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी येथील ग्रामस्थही थेंबथेंब पाण्यासाठी वणवण करत आहेत. लोक व पशुधन पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करत आहेत.

बेळगाव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात (जलसंकट) भीषण दुष्काळाचा प्रभाव कायम आहे. सात नद्यांमुळे बेळगाव जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील १२ गावांमध्ये महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज मैलोन-मैल  पायपीट करावी लागत आहे. विशेषत: बेळगाव तालुक्यातील बडाल  अंकलगी गावात पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दुसरीकडे, भीषण दुष्काळात जनतेची तहान भागवणारे स्वच्छ पाण्याचे प्लांट बंद पडले आहेत.

बेळगावच्या विविध भागात सुरू झालेले १२ आरओ प्लांट तांत्रिक अडचणी आणि देखभालीअभावी बंद पडले आहेत. शुद्ध पिण्याच्या पाण्याचे युनिट गेल्या तीन वर्षांपासून गंजत आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत लाखो रुपये खर्चून सुरू झालेले युनिट बंद पडले आहेत. पाण्याची समस्या न सोडवल्याने नागरिकांनी महापालिके विरोधात रोष व्यक्त केला आहे.

काही वॉर्डांमध्ये महापालिका आठवड्यातून एकदा पाणी सोडते. स्वच्छ पाण्याच्या प्लांटची दुरुस्ती न केल्याने लोकांनी अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला आहे. स्मार्ट सिटी आणि एका खासगी कंपनीने बांधलेल्या १४ आरओ प्लांटपैकी दोन्ही प्लांट कार्यरत आहेत. उर्वरित १२ प्लांट तीन वर्षांपासून बंद आहेत, मात्र अधिकाऱ्यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. परिणामी यंदा बेळगावकरांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत.