• मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पालकांना आवाहन

बेळगाव / प्रतिनिधी 

महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी हसन जिल्ह्यातील आलुरजवळ चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. यावेळी पालकांनी सुट्टीच्या काळात मुलांच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.

सुट्टीच्या कालावधीत विविध प्रकारच्या दुर्घटनांमध्ये बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी सूचना केली. प्रत्येकाचे आयुष्य खूप मौल्यवान आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. पालकांनी नेहमी मुलांच्या उपक्रमांचे निरीक्षण करावे, अशी विनंतीही मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली.

सुट्टीच्या दिवशी मुले पाण्यात खेळायला जातात. यावेळी एक सुरक्षित जागा निवडली पाहिजे. तसेच पालकांनी साथ दिली पाहिजे. अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे टाळावे. इतरांनीही सावधपणे वाहन चालवावे. रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्यासाठी पालकांनी  मुलांना सूचित केले पाहिजे. एकंदरीत कोणत्याही  क्रियेदरम्यान सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची विनंती मंत्र्यांनी केली.