बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने ग्रामीण भागात लोकसभेचे उमेदवार महादेव पाटील यांचा गावोगावी जाऊन प्रचार करण्यात आला.
यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीत समितीला पाठिंबा देऊन महादेव पाटील यांना मतदान करावे यासाठी राकसकोप, सोनोली, बेळगुंदी आणि बोकनुर येथे मतयाचना करण्यात आली.
या प्रचार फेरीत बेळगाव तालुका समितीचे नेते आर. एम. चौगुले, माजी आमदार मनोहर किणेकर, चेतन पाटील, राजू किणेकर, किरण मोटणकर, बी. एस. पाटील, मारुती शिंदे, रामचंद्र पाटील, किशोर पाटील, महेश पावसकर, रामा पाटील, विलास हुबळीकर, संभाजी बागिलगेकर, पुंडलिक सुतार, परशराम बेळगावकर, आप्पा हिंडलगेकर आदींनी सहभाग घेतला होता.
0 Comments