- जिल्हा पोलिस अधीक्षक बी.एस.न्यामगौडा यांची पत्रकार परिषद
बेळगाव / प्रतिनिधी
कर्जाची परतफेड करण्यास उशीर झाल्यामुळे पत्नी आणि मुलाला नजरकैदेत ठेवण्यात आल्याने निराश झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली असून याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती बेळगावचे पोलीस अधीक्षक बी. एस. न्यामगौडा यांनी दिली.
बेळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हुक्केरी तालुक्यातील इस्लामपूर येथील आत्महत्या केलेल्या शेतकरी राजू खोतगी यांची पत्नी दुर्गव्वा खोतगी आणि त्यांचा मुलगा बसवराज खोतगी यांना दीड लाख रुपयांच्या कर्जाची उशिरा परतफेड केल्याबद्दल सावकार सिद्धव्वा बयण्णवर यांनी नजरकैदेत ठेवले होते. याला कंटाळून राजू खोतगी या शेतकऱ्याने आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास सुरू असून यमकनमर्डी पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास दिरंगाईचे धोरण अवलंबल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.
0 Comments