•  गोव्यात २६ मे रोजी होणार सन्मान   

बेळगाव : बेनकनहळ्ळी  ग्रामपंचायतीचे विद्यमान अध्यक्ष यल्लाप्पा मल्लाप्पा पाटील यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी  त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र गुजरात व गोवा राज्यातील  सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडक व्यक्तीना हा राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. 

यल्लाप्पा पाटील यांनी ग्रामपंचायत अध्यक्ष म्हणून आपल्या कार्यक्षेत्रात अनेक विकासात्मक कामे केली आहेत. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन  त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार  वितरण सोहळा रविवार दि. 26 मे 2024 रोजी दुपारी 12 वाजता गोवा येथे संपन्न होत आहे.  या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये यल्लाप्पा पाटील यांना सन्मानित करण्यात येणार आहे. 

पुरस्कारमध्ये विशेष प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, म्हैसूर फेटा, चंदनाचा कायमस्वरूपी हार व भारत सरकारचे मा. केंद्रीय मंत्री यांचेकडून अभिनंदन पत्र प्रदान करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमाला दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र गुजरात, गोवा राज्यातील भारतीय सैन्य दलातील अधिकारी, सिने कलाकार, शिक्षण अधिकारी, राजकीय नेते व मठाधिश उपस्थित राहणार आहेत.