- व्हिडिओ सर्वत्र व्हायरल
धारवाड / वार्ताहर
मालमत्तेच्या वादातून ग्रामपंचायत सदस्याने स्वतःच्या भाचीला मारहाण केल्याची घटना कनकूर ता.धारवाड येथे घडली. स्थानिकांनी मोबाईलमध्ये या घटनेचा व्हिडिओ टिपला आहे. सध्या हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनला आहे.
धारवाड तालुक्यातील कनकूर या गावातील ग्रामपंचायत सदस्य मारुती पवार यांनी मालमत्तेच्या वादातून बहीण आणि बहिणीच्या मुलीला मारहाण केली आहे. इतकेच नाही तर पंचायत सदस्याचे नातेवाईक रामचंद्र नामक व्यक्तीनेही तरुणीला मारहाण केली आहे. सदर घटनेचा व्हिडीओ याचठिकाणी उपस्थित असणाऱ्या नागरिकाने मोबाईलमध्ये कैद केला असून ग्रामपंचायत सदस्याच्या या वर्तणुकीचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. गजबजलेल्या सार्वजनिक ठिकाणी महिलांशी अशापद्धतीने वर्तणूक करणे योग्य आहे का? असा सवाल जागरूक नागरिक उपस्थित करत आहेत. धारवाड ग्रामीण पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत हि घटना घडली असून व्हिडीओ समोर येताच नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments