- अथणी तालुका पत्रकार संघाचे पोलिसांना निवेदन
अथणी / वार्ताहर
कागवाडचे आमदार राजू कागे यांच्यासमोर माध्यम प्रतिनिधींना मारहाण करण्याची धमकी देणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यावर कडक कारवाई करण्याची मागणी अथणी तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
कागवाड तालुक्यातील बेवनूर गावातील जत्रा उत्सवा दरम्यान संतोष चुरमुले नावाच्या व्यक्तीने प्रसारमाध्यमांना धमकावल्याचा प्रकार समोर आला. बेवनूर गावातील अमोघ सिद्धेश्वर जत्रेत सहभागी झालेले आमदार राजू कागे यांच्यासंदर्भात वेगळ्या दृष्टिकोनातून मीडियावर माहिती व्हायरल केल्यास घर फोडण्याची धमकी संतोष चुरमुले याने माध्यम प्रतिनिधींना दिली होती. त्यानंतर आज बुधवारी अथणी तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अथणी पोलिस निरीक्षक रवींद्र नायक यांना निवेदन देऊन संतोष चुरमुले याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष बदकांबी, उपाध्यक्ष अमित कांबळे,अब्बास मुल्ला, राहुल मदार, आनंद बिरादर, लक्ष्मण कोळी, सिद्धरुड पट्टी,उमेश कोळी, रामण्णा दोड्डनिंगप्पागुळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments