- बेळगाव ग्रामीण भाजपचे मतदारांना आवाहन
- कंग्राळी के.एच व कल्लेहोळ येथे बूथ बैठक, घरोघरी संपर्क अभियान
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचारार्थ काल शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या सभेत मोदींनी देशाच्या सर्वांगिण विकासासाठी येत्या ७ मे रोजी न चुकता मतदानाचा हक्क बजावून भाजपला मतदान करा. तसेच बेळगाव मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांना मतदान करून प्रचंड मताधिक्क्याने निवडून द्या, असे आवाहन केले. यासाठी आधी "मतदान"; मग "जलपान"... हा संदेश त्यांनी दिला.
बेळगाव ग्रामीण भाजपतर्फे पंतप्रधान मोदींचा हा संदेश बेळगाव लोकसभा मतदार संघातील जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी गावोगावी बूथ बैठक, घरोघरी संपर्क अभियान राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून कंग्राळी के.एच व कल्लेहोळ येथे बूथ बैठक व घरोघरी संपर्क करण्यात आला. यावेळी येत्या ७ मे रोजी पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
भाजप बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, माजी आमदार मनोहर कडोलकर, भाजप नेते नागेश मन्नोळकर, अनिल पाटील व कल्लाप्पा पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
0 Comments