- म. ए. समितीचा शहापूर पोलिसांना अल्टीमेटम
बेळगाव / प्रतिनिधी
राजकीय वैमनस्यातून म. ए. समितीचे कार्यकर्ते सचिन केळवेकर व त्यांचे बंधू सुंदर केळवेकर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी. या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी शहापूर पोलीस स्थानकासमोर आंदोलन छेडून निवेदन सादर केले. याप्रसंगी शुभम शेळके आणि आणखी एका कार्यकर्त्यांनी, संध्याकाळपर्यंत त्या हल्लेखोराला अटक न केल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
राजकीय वैमनस्यातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते सचिन केळवेकर व त्यांचे बंधू सुंदर कळवेकर यांना काही जणांनी घरात घुसून मारहाण केल्याची घटना काल शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा नोंद झाला असला तरी पोलिसांकडून अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.
त्यामुळे आज रविवारी सकाळी मोठ्या संख्येने जमलेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते व केळवेकर कुटुंबीय यांनी शहापूर पोलीस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन छेडून हल्लेखोरांना तात्काळ गजाआड करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे तशा आशयाचे निवेदन शहापूर पोलिसांना सादर केले.
यावेळी चंद्रकांत कोंडुसकर, दत्ता जाधव, सागर पाटील, अंकुश केसरकर आदि युवा नेतेमंडळी देखील उपस्थित होते.
0 Comments