बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील सात जिल्हा पंचायत क्षेत्रामध्ये बूथ स्थरावरील कार्यकर्त्यांच्या सभा नुकत्याच पार  पडल्या.

यावेळी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी बूथ जिंकण्याचा मंत्र त्यांनी दिला. 

मारीहाळ, बाळेकुंद्री के.एच, बस्तवाड, बागेवाडी, बेळगुंदी, उचगाव, हिंडलगा अशा ७ ठिकाणी सभा संपन्न झाल्या. 

याप्रसंगी ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष युवराज जाधव यांनीही मार्गदर्शन केले.

याप्रसंगी दादागौडा बिरादार, नागेश मन्नोळकर, मलिकार्जून माद्दन्नावर, यल्लेश कोलकार, तीप्पाजी मोरे, भरमा गोमानाचे, भुजंग सालगुडे, सिधू हुक्केरी, महादेव पायानाचे, कल्लाप्पा सुतार, प्रदीप पाटील, अनिल पाटील, पंकज घाडी, विनय कदम, भाग्येश्री कोकितकर आदींनी परिश्रम घेतले.