सुळगा (हिं.) : लक्ष्मी गल्ली येथील रहिवासी आणि प्रतिष्ठित व्यक्ती अशोक मारुती पाटील (वय ५०) यांचे आज सोमवार दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वा. हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भावजय, पुतण्या, तीन बहिणी, भावोजी असा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज दु. १.०० वा. सुळगा (हिं.) स्मशानभूमीत होणार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी ८ वा. होणार आहे.