• जिल्हा न्यायालय संकुलात वकिलांना भेटून केली मतयाचना 

बेळगाव / प्रतिनिधी 

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान व्हावेत. स्वच्छ प्रशासन महान नेते अशी ओळख असलेल्या नरेंद्र मोदींच्या १० वर्षांच्या कालावधीत आजपर्यंत एकही भ्रष्टाचार झालेला नाही. तेव्हा देशाच्या भल्यासाठी भाजपला बहुमताने विजयी केले पाहिजे असे बेळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर म्हणाले, शुक्रवारी बेळगाव येथील जिल्हा न्यायालय संकुलाला भेट देऊन वकील संघासोबत झालेल्या प्रचारसभेत भाजपला मतदान करून विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी ते पुढे म्हणाले ,भाजपने दशकभरात देशात विकास केला आहे. सुरेश अंगडी यांनी केलेली विकासकामे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. बेळगावच्या जनतेचे स्वप्न अंगडी कुटुंबाने पूर्ण केले. दिवंगत सुरेश अंगडींवर आपण जे प्रेम दाखवले ते येत्या काळात दाखवले पाहिजे अशी विनंती त्यांनी केली. 

वकिलांच्या समस्या सोडवून त्यांच्या उत्कर्षासाठी मेहनत घेणार असून तुम्ही मलाही सेवा करण्याची संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले. बेळगाव बार असोसिएशन ही राज्यातील अतिशय शिस्तबद्ध संघटना आहे. वकील देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढला. वकील म्हणजे लोकांवर अन्याय झाल्यावर त्यांना न्याय देणारा. एका वकिलाला ३००० मते देण्याचा अधिकार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी भाजप कार्यकर्ते ॲड. एम.बी.जिरली, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके, आर.एस. मुतालिक, मुरगेंद्रगौडा पाटील, हनुमंत कोंगाळी यांच्यासह अनेक वकील उपस्थित होते.