• हुबळीतील विद्यार्थिनी हत्या प्रकरण : दोषीला फासावर लटकवण्याची करणार मागणी 

बेळगाव : हुबळी येथील बीवीबी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या नेहा हिरेमठ  या विद्यार्थिनीने प्रेमास नकार दिला. या रागातून मोहम्मद फैय्याज नामक युवकाने तिच्या मानेवर चाकूने हल्ला करून निर्घृण हत्या केली. 

नेहा आणि फय्याज हे दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. त्यामुळे दोघांमध्ये मैत्री झाली होती. मात्र फय्याज नेहाच्या प्रेमात पडला होता. पण नेहाने प्रेम प्रकरणाला नकार दिला. या रागातून फय्याजने हे अमानवी कृत्य केले आहे.

तेव्हा नेहावर चाकू हल्ला करून तिची हत्या करणाऱ्या फैय्याजला फासावर लटकवण्याच्या मागणीसाठी उद्या सकाळी ठीक सकाळी ११ वा. राणी कित्तूर चन्नम्मा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने विराट मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. तरी सर्व बंधू-भगिनींनी या मोर्चात  मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.