बेळगाव / प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीचा एक भाग म्हणून, भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी शुक्रवारी सकाळी शहरातील बसव कॉलनी येथे "चाय पे चर्चा" कार्यक्रमाद्वारे जनतेची भेट घेऊन मतयाचना केली.
प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विकसित भारताकडे वाटचाल करत आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सर्वच क्षेत्रात विकास झाला आहे. देशाचा विकास करण्यासाठी मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे, त्यादृष्टीने भाजपला मतदान करून विजयी करावे, अशी विनंती करण्यात आली.
याप्रसंगी बसव कॉलनीतील डॉ. रवी पाटील, के.आय. गंगेरा, एस.आर. पाटील, मोहन हुग्गार, बसप्पा चिक्कलदिन्नी, प्रकाश कोटा, प्रमोद कोटा, बी.एम. मुगदूम, चेतना बडिगेर, आदर्श पैलवान, सुरेश बंदेप्पानावर, रमेश पाटील आदि उपस्थित होते.
0 Comments