हुक्केरी : २०२४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेअंतर्गत अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री हुक्केरी तालुक्यातील भैरापुर आणि बुगटीआलुर चेक पोस्टवर सुमारे 1 लाख 18 हजार रुपये जप्त केले.
हुक्केरी मतदान केंद्राच्या सहाय्यक निवडणूक अधिकारी रेखा डोल्लनवर व अधिकारी डी बसवराजू यांच्या नेतृत्वाखाली एर्टिगा वाहनाची बुगटीआलुर चेकपोस्टवर तपासणी केली असता चालक सागर कोल्लापुरे याची तपासणी केली असता 61 हजार रुपये रोख रक्कम आढळून आली. तसेच भैरापूर चेकपोस्टवर 57 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यावेळी महसूलचे अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. बेळगाव जिल्हा पंचायत उपसचिव रेखा डोल्लनवर आणि बेळगाव उपविभागीय अधिकारी बसवण्णाप्पा कल्लशेट्टी तसेच हुक्केरी व यमकनमर्डी मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक अधिकारी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेकपोस्ट वर कारवाई करीत आहेत.
0 Comments