- बेळगाव लोकसभेचे भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांचे मतदारांना आवाहन
- बुधवारी ग्रामीण मतदारसंघात जोरदार प्रचार
![]() |
(उचगाव येथील बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर ) |
देशाचे कणखर नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत ही सर्वांची इच्छा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याची संधी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मिळाली आहे.
![]() |
![]() |
(उचगाव येथे बैठकीच्या ठिकाणी जाताना जगदीश शेट्टर) |
देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांची गरज आहे. यावेळी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत. मी सर्वांच्या सहकार्याने बेळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. तेव्हा येत्या निवडणुकीत प्रत्येक मतदाराने समजूतदारपणे विचार करून भाजपच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन बेळगाव लोकसभेचे भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी प्रचाराच्या पार्श्वभूमीवर उचगांव येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. बुधवारी बेळगाव ग्रामीण मतदारसंघात जगदीश शेट्टर यांचा जोरदार प्रचार करण्यात आला. यावेळी ग्रामीण मतदार संघाच्या पश्चिम भागातील विविध गावांना भेटी देऊन त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन केले.
![]() |
(उचगाव येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना माजी आमदार संजय पाटील) |
दरम्यान उचगाव येथील बैठकीत माजी आमदार संजय पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना देश हितासाठी सदैव कार्यरत असलेले आणि तब्बल १८ तास काम करणारे, देशातील तमाम जनतेला स्वतःचे कुटुंब मानणारे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जगदीश शेट्टर यांना मतदान करण्याची विनंती केली. यावेळी विरोधी पक्षावर त्यांनी टीका केली. निवडणूक आल्यावर भगवी शाल पांघरून हिंदुत्वाचे बेगडी प्रेम दाखवणारे विरोधक मते मागण्यासाठी येथील तेव्हा त्यांना जाब विचारा आणि येत्या निवडणुकीत त्यांना जागा दाखवून द्या अशी विनंती त्यांनी मतदारांना केली. त्याचप्रमाणे जगदीश शेट्टर यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांनी एक लक्षात घ्यावे स्वतः आमदार आणि आता मंत्री, मुलाला खासदार करायचा प्रयत्न सुरू असताना, सर्व काही तुमच्याच कुटुंबाला हवे आहे का? ज्या पक्षाने अजून पंतप्रधान पदाचा नेता जाहीर केलेला नाही. त्या पक्षाच्या नेत्यांनी भाजपवर टीका करावी हे कितपत योग्य आहे असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
- आझमनगर येथे वकिलांशी चर्चा :
यावेळी राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील, नगरसेवक श्रेयस नाकाडी, देवराज बसनवाडी, ॲड. एम. बी. जिरली, सुनील पाटील, मुरगेंद्रगौडा पाटील, प्रभू यत्नट्टी, मोहन माविनकट्टी, बेळगाव ग्रामीण भाजपचे अध्यक्ष धनंजय जाधव, बेळगाव ग्रामीण भाजपचे माजी अध्यक्ष विनय कदम, युवराज जाधव यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
- के.के.कोप्प येथून ग्रामीण मतदार संघाच्या प्रचाराचा शुभारंभ :
प्रारंभी ग्रामीण मतदारसंघाच्या के.के.कोप्प गावातील श्री सोमेश्वर देवस्थानला भेट देऊन श्री भीम आज्जांचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात करून प्रथम हलगा आणि हिरेबागेवाडी जिल्हा पंचायत कार्यकर्त्यांच्या सभेत सहभागी होऊन मतयाचना करण्यात आली.
- संतीबस्तवाड येथे जेष्ठ नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्यांसह प्रचारसभा :
यानंतर संतीबस्तवाड येथील ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्यांसह प्रचारसभा घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी कारभारामुळे भारत देश जगात झपाट्याने महासत्तेकडे वाटचाल करत आहे. तेव्हा उमेदवारापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
- किणये गावात प्रमुख व्यक्तींची सभा :
प्रचारादरम्यान पुढे किणये गावातील प्रमुख व्यक्तींची सभा झाली. या सभेत सुरक्षित प्रशासन आणि समग्र विकास हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनच शक्य आहे. तेव्हा या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याचे आवाहन जगदीश शेट्टर यांनी केले.
त्यानंतर बेळगुंदी, कुद्रेमनी, उचगाव, हिंडलगा, कंग्राळी के.एच. यागावांमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकी पार पडल्या. गावोगावी शेट्टर यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
- बेळगुंदी येथील प्रचार सभेची छायाचित्रे :
- कुद्रेमनी येथील प्रचार सभेची छायाचित्रे :
- कंग्राळी के. एच येथील प्रचार सभेची छायाचित्रे :
यावेळी माजी आमदार मनोहर कडोलकर, महांतेश कवटगीमठ, बेळगाव ग्रामीण भाजपचे अध्यक्ष धनंजय जाधव, माजी आमदार संजय पाटील यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments