हुक्केरी / वार्ताहर 

हुक्केरी तालुक्यातील हिटणी चेकपोस्टवर कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय वाहतुक करण्यात येत असलेली सुमारे १ लाख १० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हुक्केरी तालुक्यातील महाराष्ट्र हद्दीवर उभारण्यात आलेल्या हिटणी चेकपोस्टवर निवडणूक अधिकारी डी. बसवराजू यांनी  एमएच-०३, सीएम १८२९  क्रमांकाच्या टोयोटा फॉर्च्युनर कारची तपासणी केली असता त्यामध्ये  १ लाख १० हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली. निवडणूक आचारसंहितेच्या नियमानुसार प्रवासादरम्यान ५० हजारांहून अधिक रक्कम सोबत नेताना अधिकृत कागदपत्रे दाखविणे बंधनकारक असताना प्रवास करणाऱ्यांकडे या रक्कमेबाबत कोणतीही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे निवडणूक अधिकारी रेखा डोलन्नावर यांनी सदर रक्कम जप्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी संकेश्वरचे पोलिस निरीक्षक शिवशरण आवुजी व निवडणूक अधिकारी उपस्थित होते.