कागवाड / वार्ताहर 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कागवाड तालुक्यातील मडभावी, मंगळसुळी आणि गणेशवाडी तपासणी नाक्यांना अचानक भेट देऊन पाहणी केली. कोणत्याही कारणास्तव वाहनांची तपासणी केल्याशिवाय सोडू नका, कोणत्याही अधिकाऱ्यांसह जे कोणी असतील  त्यांची वाहने सक्तीने तपासावीत आणि काळजी घ्यावी.'' अशी सूचना त्यांनी तपासणी नाक्यांवर कार्यरत निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केली. 

यावेळी जिल्हापोलिस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांच्यासह तालुका पंचायत अधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.