बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी सोमवारी लक्ष्मी टेकडी येथील हुक्केरी हिरेमठ शाखेला भेट देऊन श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींचे आशीर्वाद घेतले.
यावेळी जगदीश शेट्टर आणि स्वामीजींनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींनी शेट्टर यांचा गौरव करून आशीर्वाद दिला. यावेळी शेट्टर म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशात नवा बदल घडला आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. मला बेळगाव लोकसभेतून निवडून येण्यासाठी आशीर्वाद द्या अशी विनंती त्यांनी स्वामीजींना केली.
यावेळी भाजपचे राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, राज्य अल्पसंख्याक कल्याण महामंडळाचे माजी अध्यक्ष मुक्तार हुसेन पठाण, इरण्णा कोट, विरूपाक्षय्या निरलगीमठ, चंद्रशेखरय्या सवदी, नगरसेविका वीणा विजापुरे, बुडाचे माजी अध्यक्ष घुळाप्पा होसमनी, मुरुगेंद्रगौडा पाटील, दादागौडा बिरादार आदी उपस्थित होते.
0 Comments