बेळगाव / प्रतिनिधी
लोकसभा मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी "चाय-पे-चर्चा" अंतर्गत आज सोमवारी सकाळी शाहूनगर भागात भेट देऊन जनतेशी संवाद साधला.
मॉर्निंग वॉक करताना येथील नागरिकांना भेटून त्यांनी आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मतदान करावे अशी मागणी केली. यावेळी नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जगदीश शेट्टर म्हणाले, बेळगावात प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर अल्पावधीतच मला उस्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जगदीश शेट्टर यांच्यासमवेत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके, शंकरगौडा पाटील, किरण जाधव, माजी उपमहापौर रेश्मा पाटील, नगरसेवक श्रेयस नाकाडी , शाहूनगर गणपती मंदिर विश्वस्त समिती सदस्य , शिवमंदिर विश्वस्त समिती सदस्य मुरुगेंद्रगौडा पाटील, दादागौडा बिरादार, मंडळ अध्यक्षा विजया कोडगनूर, भास्कर शेट्टी, डॉ. बसवराज जगजंपी, निवृत्त भाकप अप्पाण्णा अंगडी, भालचंद्र सावनूर, अरविंद अष्टेकर, सदानंद पाटील भाजप महिला पदाधिकारी व शाहूनगरनगरचे कार्यकर्ते उपस्थित होते.
- व्हिडिओ -
0 Comments