बेनकट्टी : आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गरज आहे, असे बेळगाव मतदारसंघातील भाजपचे लोकसभा उमेदवार माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर म्हणाले, शुक्रवारी त्यांनी बेनकट्टी येथील श्री दुर्गादेवी मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेला, त्यानंतर गावातील  स्थानिक भाजप नेत्यांच्या  गाठीभेटी  घेतल्या. नरेंद्र मोदींचे नेतृत्व पाहून पाकिस्तानही स्वतःची  आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी  मोदींसारख्या नेत्याची गरज आहे, असे म्हणत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी आगामी निवडणुकीत भाजप उमेदवाराला मतदान करा असे आवाहन जगदीश शेट्टर यांनी केले. 

भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आम्ही आमच्या तालुक्यामध्ये पूर्ण प्रयत्न करणारं असल्याचेतालुका भाजप नेते विरुपक्षप्पा मामाणी यांनी सांगितले. तर आ. रत्ना  मामानी म्हणाल्या, आमच्या तालुक्यातील मतदारांनी घराण्यावर विश्वास टाकून आम्हाला मोठ्या मताधिक्क्याने विजयी केले आहे. तेव्हा जगदीश शेट्टर यांना मतदान करून आमच्या कुटुंबाचा मान वाढवावा अशी विनंती त्यांनी केली. 

जगदीश शिंत्री, सोमप्पा बिष्टन्नवर, पुंडलिक मेटी, गुरू मेळ वंकी, प्रवीण चिन्नप्पनवर, कडप्पा वीरशेट्टी,  पंचप्पा मतारी, अशोक येरझरवी, इराय्या हिरेमठ, प्रकाश कल्लाडे, सुरेश सावरगी, महादेवा हुली, लक्कप्पा मुरव्वाडे, गुरप्पा मुरवडे, आदी उपस्थित होते.